अशाच धुंद सांजवेळी
वाऱ्याचा झोक्यावर झुलती
आतुरतेचे दोन तुषार
सखया तू ये ना ……

चाहूल खोटी जरा लागते
वेड मनी मज उगा लावते
बहरात मधुर गांधार
सखया तू ये ना ……
आभाळात मेघ गरजती
मीलनाची चाहूल देती
गात सुरील मल्हार
सखया तू ये ना ……
शृंगारून मी वाट पहाटे
नयन लाजत हळू ऐकविते
तुज पैंजण झ्हानाकार
सखया तू ये ना ……
रिमझिम धारा कोसळती
तृष्णा धाराची पूर्ण पुरविती
मीच ऐकली तृषित बेजार
सखया तू ये ना ……
#truessence